सर्कलवाडी (जिल्हा सातारा) येथे मद्यधुंद पोलीस कर्मचार्‍याने झोपलेल्या व्यक्तीला चिरडले !

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी या गावात २५ एप्रिल या दिवशी पहाटे ज्ञानेश्वर बाबुराव राजे या पोलीस कर्मचार्‍याने रमेश लक्ष्मण सकपाळ यांना चारचाकीने चिरडले. रमेश सकपाळ हे घराच्या ओसरीवर झोपलेले होते. ज्ञानेश्वर राजे मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांना गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी ओसरीवर चढली. यामध्ये रमेश चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका :

असे मद्यधुंद पोलीस काय कामाचे ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !