टेंपोसह चालक पोलीस ठाण्यात

कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरून नांदगावमार्गे कणकवलीच्या दिशेने येणारा गोवंशाची वाहतूक करणारा टेंपो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून लतानगरी, बेळणे येथे पकडला. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी गोवंशासह टेंपो कह्यात घेतला.
त्यानंतर टेंपोसह चालकाला कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ‘टेंपोतील गोवंश गोशाळेत देण्यात यावीत आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
याविषयी माहिती मिळाल्यावर नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पंढरी वायंगणकर, बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके, बेळणे पोलीस पाटील चाळके आदी घटनास्थळी आले होते.