
सांगली, २५ एप्रिल (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व ३० पर्यटक सुरक्षित असल्याविषयी कळवण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.