वर्ष २०१४ मध्ये लाच घेतांना रंगेहात पकडलेल्या तलाठ्याला सक्तीची निवृत्ती

दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने ‘म्युटेशन’संबंधी कामासाठी ७ सहस्र रुपयांची लाच घेतांना सारझोरा पंचायतीचे तत्कालीन तलाठी जेरी फर्नांडिस यांना रंगेहात पकडले होते.

सासोली येथे सहहिस्सेदारांचा विरोध झुगारून परप्रांतियांसाठी पोलीस बंदोबस्तात भूमीची मोजणी

स्थानिकांचा आक्षेप असतांनाही तालुक्यातील सासोली येथील सामायिक भूमीचा सर्वे ४ एप्रिल या दिवशी करण्यात आला.

वेताळबांबर्डे येथील २ मंदिरातील ३ दानपेट्या फोडल्या

तालुक्यातील देऊळवाडी, वेताळबांबर्डे येथील श्री देव लिंग मंदिर आणि श्री गणपति मंदिर या २ मंदिरांतील एकूण ३ दानपेट्या अज्ञातांनी फोडल्याचे ५ एप्रिल या दिवशी सकाळी उघड झाले.

गोव्यात प्रतिदिन एक रुग्णाचा कर्करोगाने होतो मृत्यू

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वर्ष २०२४ मध्ये कर्करोगामुळे ४०४ रुग्णांचा मृत्यू झाला. यानुसार प्रतिदिन कर्करोगाने ग्रासलेल्या एका रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे.

बांगलादेशी घुसखोर महिलेला उल्हासनगर येथून अटक !

कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे धाडस करत आहेत.

आज कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील पशूवधगृहे बंद !

६ एप्रिल या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या जनावरांची पशूवधगृहे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोल्हापूर शहरातील अनधिकृत शीतपेये, तसेच अवैध हातगाड्या यांच्यावर तात्काळ कारवाई करा !

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारात मृतदेहासाठी वापरलेला बर्फ बाहेर टाकला होता. हा बर्फ काही अनधिकृत विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात वापल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट !

‘मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे काही विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुमती घेऊनच मी इथे चर्चेसाठी आलो आहे’, असे त्यांनी सांगितले.

पुणे येथे ‘राधा-राणी पाणपोई’चे सद्गुरु आणि संत यांच्या शुभहस्ते उद्घाटन !

काळेपडळ येथील श्री राधाकृष्ण मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० मार्च या दिवशी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

समर्थ रामदासस्वामींनी अंध कारागिराच्या माध्यमातून घडवलेली श्रीरामाची मनोहारी मूर्ती आणि त्याची अद्वितीय कथा !

सज्जनगडावर समर्थांचे समाधी मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले. तेथे वरच्या बाजूला प्रभु श्रीरामाची मूर्ती आहे.