विक्रोळी-कन्नमवार नगर येथील शिव-शंभू भक्त हरपला !

श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ओंकार कोलते

मुंबई – विक्रोळी-कन्नमवार नगर येथील श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ओंकार कोलते (वय २८ वर्षे) यांचे २१ एप्रिल या दिवशी अपघाती निधन झाले. विक्रोळी-कन्नमवार परिसरात शोककळा पसरली आहे. इयत्ता सातवीपासूनच ते श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरात राष्ट्र-धर्माच्या कार्यात सक्रिय होते. ते विक्रोळी-कन्नमवार परिसरातील सर्व शिवस्मारकांचे प्रत्येक रविवारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूजन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता.