‘अभिजात मराठी’साठी समिती गठीत करणार ! – उदय सामंत, मराठी भाषा मंत्री
मराठी भाषेला ‘अभिजात मराठी भाषे’चा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेचे संशोधन आणि विकास यांसाठी, तसेच भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येईल, असे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी सांगितले.