पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

सातारा येथील श्री काळाराम मंदिरात ‘रामनवमी उत्सवा’स प्रारंभ !

सर्व कार्यक्रम भाविक-भक्तांच्या देणग्यांमधून पार पाडले जातात. तरी समस्त श्रीरामभक्तांनी या उत्सवामध्ये यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त मोहनभाई शहा यांनी केले आहे.

Chhattisgarh Ram Temple Reopened : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बंद केलेले श्रीराममंदिर गुढीपाडव्यापासून सर्वांसाठी खुले !

२१ वर्षे बंद होते मंदिर ! भ्रष्टाचारावर लगाम आणण्याच्या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा (धोरण) नेमका काय आहे ?, हेच अशा उदाहरणांतून लक्षात येते !

Gudhi Padva 2024 : ४ राज्यांत एकूण ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता आणि सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण !

विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढीपूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य’ स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली.

Palasnath Temple : ४६ वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत असलेल्या उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले !

१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे.

शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी उपाययोजना काढा !

त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्‍हे यांनी ‘त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी.

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णाेद्धाराला ६०० वर्षे लागणे, हे भारतातील हिंदूंना लज्जास्पद !

‘जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर होणार जिर्णोद्धार !

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

ब्रिटनने याहून अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे !

ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.

Tajmahal Shiva Temple : ताजमहाल हे शहाजहानच्या आधीपासून अस्तित्वात असून ते तेजोमहालय आहे !

‘योगेश्‍वर श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट’चा न्यायालयात दावा