आमदारांची बैठक घेऊन केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार ! – मंत्री शंभुराज देसाई
काही ठिकाणी विकासकामे करण्यात अडचणी येत आहेत. हा प्रश्न केंद्रशासनाशी संबंधित असल्याने आणि पुष्कळ काळ प्रलंबित असल्याने संबंधित आमदारांनी त्यांची पत्रे, निवेदने मला द्यावीत. या आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, असे उत्तर पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर दिले.