श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची काढण्यात येणार रथांतून मिरवणूक !

सोमवार, १८ जानेवारीपासून जत्रोत्सवाला प्रारंभ होत असून शनिवार, २३ जानेवारीपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांनुसार जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. १८ जानेवारी या दिवशी सकाळी धार्मिक विधी झाल्यावर बारा गावकर नमनाला बसणार आहेत.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा जत्रोत्सव

या देवीचा सर्वांत मोठा उत्सव, म्हणजे जत्रोत्सव ! हा जत्रोत्सव पौष शुक्ल पक्ष पंचमी ते पौष शुक्ल पक्ष दशमी, या कालावधीत साजरा होतो. ‘मालना मासी हो पंचमी तिथी जात्रे केला आरंभ’, असा शिलान्यास मंदिराच्या ठिकाणी आहे.

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

हिंदूंच्या विरोधातील नवीन षड्यंत्र जाणा !

आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिर !

अय्यप्पा सेवा समिती, मांगोरहिल, वास्को या संस्थेची स्थापना मार्च १९७८ मध्ये झाली. तेव्हापासून गेल्या ४२ वर्षांत या समितीने लक्षणीय प्रगती साधली असून गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये श्री अय्यप्पा मंदिराची गणना होते.

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महोत्सवाला आजपासून प्रारंभ

मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले