माधवनगर (जिल्हा सांगली) येथे रेल्वेचे नवीन टर्मिनल उभे करण्याची प्रवासी आणि व्यापारी यांची मागणी !
जिल्ह्यातील माधवनगर येथे रेल्वेच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याने प्रवासी आणि व्यापारी यांच्या लाभासाठी ‘या जागेवर ५ प्लॅटफॉर्मचे नवीन सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल उभे करावे’, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील प्रवासी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.