Shiva Temple Under Jama Masjid Aligarh: अलीगड (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीच्या ठिकाणी पूर्वी होते शिवमंदिर !

देशातील बहुतेक जुन्या मशिदींच्या ठिकाणी पूर्वी हिंदु मंदिरे होती, असेच आता जनतेला वाटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता या मशिदींचा इतिहास शोधण्यासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेवर ३ सहस्र २३३ प्रलंबित आश्‍वासनांचे ओझे !

आश्‍वासने वर्षानुवर्षे प्रलंबित रहाणे आणि त्यांची संख्या सहस्रावधींच्या वर होईपर्यंत त्याविषयी धोरणात्मक निर्णय न होणे हे विधीमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने गंभीर सूत्र आहे. हा विधीमंडळाचा अवमानच होय !

माहिती अधिकार कायद्याची महाराष्‍ट्रात दुर्दशा; सर्वाधिक अपिले, तक्रारी प्रलंबित !

‘आर्.टी.आय.’च्‍या (‘माहिती अधिकार कायद्या’च्‍या) वाढत्‍या वापरामुळे प्रशासनात धाक निर्माण झाला आहे; मात्र अद्याप त्‍याचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसून त्‍याला पंगू करण्‍याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. परिणामी देशभरात साडेचार लाख द्वितीय अपिले प्रलंबित आहेत.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षा शुल्कातील सवलतीमुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची हानी !

‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्‍या जनमाहिती अधिकार्‍यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !

राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात दडवला जात आहे सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार

भ्रष्टाचार करणे आणि तो लपवणे, ही सरकारी यंत्रणांची जणू कार्यपद्धतच बनली आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणार्‍यांनाही तो संपवता आलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे महापालिकेमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला माजी नगरसेविकेची मारहाण !

माहिती अधिकाराच्या नावाखाली इतरांना त्रास देणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी काय उपाययोजना काढता येतील ? हे प्रशासनाने पहावे. त्याचप्रमाणे मारहाण करणे कितपत योग्य ? हे माजी लोकप्रतिनिधीने पहावे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव सहावा दिवस (२९ जून) :  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध संघटना आणि युवक यांनी केलेला संघर्ष

वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. ‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ?

भ्रष्टाचार प्रकरणी ‘महावितरण’च्या अभियंत्याचे निलंबन !

भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार रोखता येणार नाही, हे प्रशासनाने लक्षात घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक !

नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज !

प्रत्येक संचालकाची स्वमालमत्ता तारण ठेवणे आणि संस्थेचा त्रैमासिक प्रगती अहवाल घेणे या दोन्ही अटी अपूर्ण ठेवल्याने शासनाची भागभांडवलापोटी गुंतवलेली आणि कर्जापोटी दिलेली रक्कम बुडीत जाईल, अशी विदारक स्थिती आहे !