थोडक्यात महत्त्वाचे : ठाणे येथे महिलेवर बलात्कार करणारा धर्मांध अटकेत !

ठाणे येथे महिलेवर बलात्कार करणारा धर्मांध अटकेत !

ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) – येथील वागळे इस्टेट भागातील विवाहितेला विषारी रसायन पाजण्याची धमकी देत तिच्यावर अन्य २ साथीदारांसह बलात्कार करणार्‍या अजबअली शेख (वय ३४ वर्षे) याला ७ वर्षांनंतर बंगाल येथून अटक केली आहे. (धर्मांधाला गुन्हे करून लपण्यासाठी बंगाल सोयीचे का वाटते, याचा विचार करणे आवश्यक आहे ! – संपादक) त्याच्या २ साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे.


पनवेल येथे मंदिरात चोरी

पनवेल – येथील जरी मरी मंदिरात आकाश चरण (वय ३२ वर्षे) याने दानपेटीतील ३ सहस्र रुपयांची चोरी केली होती. त्याला कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका : हिंदूंची असुरक्षित मंदिरे !


बांगलादेशी तरुण पनवेल येथे अटकेत !

पनवेल – येथील खांदा गावात अवैध वास्तव्य करून रहाणारा महंमद इफ्तिकार मोल्ला (वय ३० वर्षे) या बांगलादेशी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तो बांधकाम मजुराचे काम करत होता.

संपादकीय भूमिका : सर्वत्रच्या बांगलादेशींना राज्यातून हाकलायला हवे !