मद्याचे दुकान हटवण्यासाठी ग्रामस्थांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन !

तालुक्यातील पिंपरी येथे चालू असलेले अवैध देशी मद्याचे दुकान तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वडोदबाजार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

४ विद्यार्थिनी मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे उघड; विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, तेही पुणे विद्यापिठात अशा गोष्टी घडणे पुणेकरांसाठी लांच्छनास्पद ! मद्यप्राशनावर आळा घालण्यात वसतीगृह प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर २७२ जणांवर पोलिसांची कारवाई !

पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.

पावणे ३ कोटी रुपयांच्या मद्याची पोलिसांकडून विल्हेवाट

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते.

राजापूर येथे ९२ लाख रुपये किंमतीच्या मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

पथकाने ९२ लाख रुपयांचा मद्याचा साठा, भ्रमणभाष संच आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला टेंपो, असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर निरीक्षक अटकेत !

कराड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच स्वीकारतांना विभागाने रंगेहात पकडले. भीमराव शंकर माळी, असे कराड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षकाचे नाव असून मुस्तफा मोहिदिन मणियार असे त्यांच्या खासगी साहाय्यकाचे नाव आहे.

नागपूर येथे दारूड्या वडिलांची मुलाकडून हत्या

हुडकेश्वर येथे दहावीत शिकणार्‍या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई यांना कह्यात घेतले आहे.

सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या चौघांवर कारवाई !

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.

गोव्यातून तस्करी करून आणलेला सवा कोटी रुपयांचा मद्यसाठा पुणे येथे जप्त !

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून तस्करी करून आणलेला १ कोटी २० लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या कारवाईत १ सहस्र ६६८ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने निगडी आणि नसरापूर या भागांतून ९ जणांना अटक केली आहे.

पिंपरी (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियम बनले दारूड्यांचा अड्डा !

पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालयासमोरील प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले यशवंतराव चव्हाण स्टेडियम सध्या दारूडे आणि चरसी यांचा अड्डा बनला आहे.