
अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे आध्यात्मिक सेवेचा वसा लाभलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून महेश इंगळे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांंनी व्यक्त केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होतेे.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष महेश इंगळे यांनी नरेंद्र पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि प्रसाद देऊन सत्कार केला. या वेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजेे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीसह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, व्यंकटेेश पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, महादेव तेली, विपूल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !