घरी विलगीकरण केलेल्या नागरिकांचे आंध्रप्रदेश सरकार करणार ‘मोबाईल ट्रॅकिंग’ !

विदेशातून परत आल्यानंतर ज्या नागरिकांना घरी विलगीकरणात (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आंध्रप्रदेश सरकार त्यांचे भ्रमणभाष (मोबाईल) ‘ट्रॅकिंग’ करणार आहे.

राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि त्यांचे कर्मचारी यांवर नियंत्रण घ्या ! – आंध्रप्रदेशमध्ये शासनाचा निर्णय

आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या शासनाने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि त्यांचे कर्मचारी यांवर नियंत्रणासाठी आदेश जारी केला आहे.

आंध्रप्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ

येथील प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये; म्हणून ठिकठिकाणी जाण्यासाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासीभाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती विरोधक वापरत आहेत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सर्वांची प्रगती व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, अशी नीती वापरली अन् आता विरोधकही तीच नीती वापरत आहेत. त्यात ते सफल होणार नाहीत. वैयक्तिक स्वार्थासाठी विरोधक फूट पाडत आहेत, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.