अनुसंधान हा देहस्‍वभावच व्‍हावा !

‘स्‍त्रियांना अनुसंधान म्‍हणजे काय, ते लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे. कुलीन स्‍त्रीचे लक्ष सदा पदराकडे असते. कितीही घाई असली, कितीही मुले अंगावर खेळत असली, तरी बाईचे पदराकडे कधी दुर्लक्ष होत नाही. पदराकडे लक्ष ठेवणे, हा तिचा देहस्‍वभावच होऊन बसतो.

आपल्याला पेलण्यासारखी असेल तेवढीच साधना गुरु सांगतात !

नामाने मनास शाश्वत समाधान निश्चित लाभेल, याची हमी मी घेतो. त्यांनी जे ज्ञान सांगितले ते मलाही सांगता आले असते; पण जो धडा पचनी पडणार नाही तो देण्यात अर्थ काय ? म्हणून तो दिलेला नाही.’

गोवा : आध्यात्मिक पर्यटनाचे एक अग्रगण्य केंद्र !

‘आध्यात्मिक पर्यटना’चे अग्रगण्य केंद्र म्हणून गोव्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या समृद्ध इतिहासाने भारतासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देत आहे.

सूर्य सत्याच्या आधारावर आणि सत्य हे ब्रह्माचेच पर्यायी नाव !

व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या विशेषांमुळे सत्याचे होणारे ज्ञान सापेक्ष असू शकेल. मुळात सत्यालाच सापेक्ष म्हणणे, हे सत्य शब्दाचा अर्थच गमावण्यासारखे आहे.

आपण कर्तव्य करून फळ रामावर सोपवावे !

जी मरतील त्यांच्याविषयी दुःख मानू नये. जी येतील ती भगवंताच्या कृपेने आली, असे मानावे.

कर्मे ब्रह्मार्पण केव्हा होतात ?

अहंकार सोडला की, कर्मे ब्रह्मार्पण होतात. ‘मी करतो’, ही भावना सोडली की, कर्मे ब्रह्मार्पण होतात.

योगसाधनेपेक्षा नामस्मरण श्रेयस्कर !

शक्ती जर नामस्मरणात व्यय केली, तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल, तरी आवर्जून नामस्मरणास लागावे.

साधनेचा भाषेवर होणारा परिणाम

भावपूर्णरित्‍या कोणत्‍याही भाषेत लिहिले, बोलले किंवा वाचले, तरी भावातील सात्त्विकतेचा परिणाम भाषेतील अक्षरे, शब्‍द आणि वाक्‍य यांवर होऊन भाषेतून सकारात्‍मक स्‍पदंने प्रक्षेपित होऊ लागतात. यावरून ‘अध्‍यात्‍मात भाषेपेक्षा भावाला किती महत्त्व आहे’, हे लक्षात येते.

क्रियायोग

भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.