मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांच्यासाठी एकच तिकीट !
मुंबई मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांसाठी ‘मुंबई १’ हे कार्ड चालणार आहे. येत्या एक महिन्यात हे कार्ड चालू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी ११ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.