सद्यःस्थितीत अग्नीशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक ! – सी.पी. राधाकृष्णन्, राज्यपाल
राज्यातील ८ अग्नीशमन अधिकारी आणि जवान यांना ‘राष्ट्रपती’ पदके प्रदान
राज्यातील ८ अग्नीशमन अधिकारी आणि जवान यांना ‘राष्ट्रपती’ पदके प्रदान
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडूनच अमली पदार्थांचा व्यवसाय केला जात असल्याचा संशय तेलंगाणा राज्यातील भाग्यनगर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला आहे.
येथील पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना ६३ ऑनलाइन विविध सेवा घरबसल्या मिळतील. या ॲपचे लोकार्पण भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दि.बा. पाटील विद्यालयात करण्यात आले.
बांधकाम साहित्यासह मंदिरांतील घंटा आदींची चोरी केल्याच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जणांना अटक केली आहे, तर अन्य ४ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
भ्रष्टाचार किंवा अन्य कोणते अपकृत्य केल्यास सदस्य बहुमताने नगराध्यक्षांना पदच्युत करू शकतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय १५ एप्रिल या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कारागृहामध्ये काम करतांना अपघात, पोलिसांची मारहाण, बंदीवानांतील आपापसांतील मारहाण आदींमुळे बंदीवानाचा मृत्यू झाल्यास आणि अन्वेषणात हे निष्पन्न झाल्यास बंदीवानांच्या वारसांना ५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आय.आर्.सी.टी.सी.) चालू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेअंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा’सह ही विशेष रेल्वे येत्या १७ एप्रिलपासून पुणे येथून सोडण्यात येणार आहे.
‘चिंतामणी सेवक फाऊंडेशन’चे श्री. सोहम कुराडे यांची बजरंग दलाच्या कोल्हापूर जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.
काही वर्षांत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडन म्हणजेच युके येथे भव्यदिव्य स्वरूपात साकारले जाणार आहे. यानिमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे.
डेक्कन परिसरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहा’त १३ एप्रिल या दिवशी ‘भारत रक्षा मंच’ आयोजित व्याख्यान सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.