काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – शारदा आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी काशीतील ज्ञानवापी मशीद विरुद्ध भगवान काशी विश्‍वेश्‍वर या खटल्यात पक्षकार बनण्याची मागणी करणारे प्रार्थनापत्र येथील न्यायालयात दिले आहे. याला न्याय मित्र असणारे विजयशंकर रस्तोगी आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता तौहीद खान यांच्याकडून विरोध करण्यात आल्यावर यावर ११ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सुनावणी करण्यात येणार असतांना आता हे प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.