‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.

ख्रिस्ती संघटना ‘लव्ह जिहाद’ला विरोध कधी करणार ?

कोची (केरळ) येथील सायरो मलबार चर्चच्या येथील कदवंथरा सेंट जोसेफ चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह झाला होता. यावरून झालेल्या वादामुळे विवाह करून देणार्‍या पाद्य्राला क्षमा मागावी लागली.

आयुर्वेदीय वैद्यांना नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची केंद्र सरकारची अनुमती

केंद्र सरकारने आयुर्वेदीय वैद्यांना आता शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिली आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थी हे शस्त्रकर्म करू शकणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला आहे.

केरळ राज्यात आता सामाजिक माध्यमांवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.

हिंदु मुलींचे दलाल !

मोदी सरकारने या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हिंदु मुलींची अब्रू वाचवणारा, त्यांची दलाली रोखणारा आणि प्राण वाचवणारा कायदा येण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते पालट करावेत, अशी तमाम हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची आवश्यकता नाही !’ – अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई उपनगर, काँग्रेस

लव्ह जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही. त्यामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले.

बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा आणणे राज्यघटनाविरोधी !

राजस्थानचे काँग्रेसी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ! मुसलमान हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींची फसवणूक करतात याला गेहलोत प्रेम समजतात का ? जर नाही, तर ते याच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत ?

श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या मृत कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यावर न्यायालयाकडून बंदी  

श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.