गोव्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्ष कृतीशील

गोव्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप हे ४ पक्ष असू शकतात. या अनुषंगाने काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे; मात्र या दोन्ही पक्षांनी याविषयी गुप्तता पाळली आहे.

इंग्लंड आणि शारजहा येथून आलेले ५ जण कोरोनाबाधित !

गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

लोकशाहीला डाग !

सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !

काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिले आमदारकीचे त्यागपत्र : तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसची गोव्यात दयनीय स्थिती : काँग्रेसच्या आमदारांची संख्या पोचली २ वर

तृणमूल काँग्रेसशासित बंगालचा आतंकवादी चेहरा !

सद्यःस्थितीत बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे आणि अन्य जिहादी संघटनांमुळे धर्मांधांच्या देशविघातक कारवाया वाढलेल्या आहेत. ते रोखण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यासह राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते !

गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.

आमदार चर्चिल आलेमाव यांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सभापतींकडे मागणी

आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केल्याचे प्रकरण

आगामी निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांची युती जिंकणार !  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

“बंगालमध्ये ज्या पद्धतीने योजनाबद्धरित्या निवडणूक जिंकली, त्याप्रमाणे गोव्यासाठीही आमची विशेष योजना आहे. मी सर्व धर्म आणि जाती यांच्यासाठी काम करते” – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास ‘गृहलक्ष्मी’ योजना चालू करून कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमास ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार !’

महिलांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सक्षम न बनवता त्यांना आमिषे दाखवून कमकुवत बनवणारे राजकीय पक्ष !

पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !

गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !