उजव्या मार्गिकेवरून अवजड वाहने चालवणार्‍या ७५ सहस्र वाहनचालकांवर कारवाई

उजव्या मार्गिकेवरून अवजड गाड्या चालवणार्‍या ७५ सहस्र वाहनचालकांवर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘आम्ही दोन मास विशेष मोहीम घेतली होती, यापुढेही ही कारवाई चालू राहणार आहे’, अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.

सोलापुरात १ नोव्हेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती चालू

येथे १ नोव्हेंबरपासून पुन्हा आर्टीओ, तसेच सोलापूर वाहतूक शाखा पोलिसांनी हेल्मेट सक्तीसाठी ठिकठिकाणी थांबून हेल्मेट न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तसेच चारचाकी वाहन चालवतांना सीट बेल्ट न वापरणार्‍यांवरही दंड आकारला.

गोव्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी संपत्ती घोषित करण्याचे लोकायुक्तांचे आवाहन

मंत्री, आमदार, शासकीय अधिकारी आदींनी ५ नोव्हेंबरपर्यंत वर्ष २०१८-१९ या वर्षापर्यंतची त्यांची संपत्ती आणि कर्ज यांविषयीची माहिती द्यावी, असे आवाहन ‘गोवा लोकायुक्त’ यांनी केले आहे.

निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेकडून ३ बँकांवर दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने पुणे येथील जनता सहकारी बँक, जळगाव येथील पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँक यांच्यावर रिझर्व्ह बँकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.