‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरत्या बंदीला देहली उच्च न्यायालयात आव्हान
येत्या २१ जून या दिवशी देशात होणार्या ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे. याविरोधात टेलिग्रामने देहली उच्च न्यायालयात या बंदीला आव्हान दिले आहे.