Sant Siyaram Baba : मध्यप्रदेशातील ११० वर्षीय संत सियाराम बाबा यांचा देहत्याग !
खरगोन येथील निमाड शहरातील ११० वर्षीय संत सियाराम बाबा यांनी ११ डिसेंबर सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी देहत्याग केला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार चालू होते. दुपारी ३ नंतर त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या पार्थिवावर आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.