विधेयक देशहिताचे असल्याने शिवसेनेने पाठिंबा दिला ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला असल्याने त्यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्टीकरण दिले आहे.

भाग्यनगर येथील बलात्कारासारख्या घटनांची थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हावी ! – शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी

महिलांच्या विरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सर्वोच्च न्यायालयात चालवले जावेत, यासाठी कायदा होणे आवश्यक आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही पुष्कळ संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून चालू होऊन ती पुढेही चालूच राहते.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घाला !’

धर्मांधांना आणि ढोंगी पुरो(अधो)गामी यांना खुश करण्यासाठी काँग्रेसवाले मधे मधे अशी बांग देत असतात, तेच हुसेन दलवाई यांनी आता केले आहे ! हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असणार्‍या ‘PFI’ या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी ते का करत नाहीत ? कि ती इस्लामी संघटना आहे; म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष . . . ?

सनातनच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील !

सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. या कार्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे योगदान अमूल्य आहे. त्यामुळे अशा प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातनच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील, असा आमचा दृढ विश्‍वास आहे.

शिवसेनेला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी शांत झालेले कोरेगाव भीमा प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, सांगली.

कोरेगाव भीमा प्रकरणात गुरुजींवर आरोप करणारे या प्रकरणातील चौकशी आयोगासमोर जाऊन का तक्रार देत नाहीत ? यापूर्वी आंबेडकर यांनी ‘सभेत आरोप करणे आणि प्रत्यक्ष आयोगासमोर सांगणे यात फरक असतो’, असे सांगितले आहे. त्यामुळे गुरुजींवर होत असलेले आरोप हे केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच करण्यात येत आहेत.

मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास पुरातत्व खात्याकडून संमती

गेटवे ऑफ इंडियाजवळ महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या पुढील चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास पुरातत्व खात्याने संमती दिली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ डिसेंबर या दिवशी दिला आहे.