राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायदा हा राज्यघटनाविरोधी असल्याचे विधान केले आहे. यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींनी ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नसल्याचे विधान केले होते. मुसलमान प्रेमापोटी म्हणण्यापेक्षा मुसलमानांच्या मतांसाठी राजकारणी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे काँग्रेसी राजकारण्यांचा विरोध साहजिक आहे. त्यांना सत्तेसाठी मुसलमानांचे असे लांगूलचालन करावे लागते. आतापर्यंत असे लांगूलचालन करून धर्मांधांना गुन्हेगारी कारवाया करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांची प्रतिमा काँग्रेसनेच सर्वांत अधिक मलीन केली आहे, हे मुसलमानांनीही जाणून घेणे अपेक्षित आहे. सत्तेसाठी जे देशाचाही बळी द्यायला मागे-पुढे पहात नाहीत, ते हिंदु मुलींची दलाली रोखणारा ‘लव्ह जिहाद’ कायदा करण्याला विरोध करतात, यात नवल नाही.
कावेबाज धर्मांध !
अभिनेते झिशान अय्युब यांनीही नुकतेच ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’, असा प्रश्न उपस्थित करून ‘लव्ह जिहाद’ ही खोटी संकल्पना असल्याचे म्हटले आहे. हे लोक एवढे हुशार आणि कावेबाज असतात की, जनतेचे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात किंवा ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करणार्या सरकारच्या विरोधात मत बनेल, अशा प्रकारचे जनतेची दिशाभूल करणारे प्रश्न उपस्थित करतात. हिंदूंनी त्यांचा हा कावेबाजपणा हेरून त्यांना उलट प्रश्न विचारायला हवेत आणि हिंदूंमध्येही ‘लव्ह जिहाद’ या धोकादायक गोष्टीविषयी प्रबोधन करायला हवे. झिशान अय्युब यांनी ‘प्रेम केल्यावर कारागृहात जावे लागेल कि प्रेम करण्यापूर्वी धर्म पहावा लागेल ?’, असा प्रश्न उपस्थित केला असून सर्वसामान्य हिंदू बुचकळ्यात पडून ‘सरकारचे काहीतरी चुकते आहे’, असा आभास निर्माण केला आहे. झिशान अय्युब यांना आमचा प्रश्न आहे की, ‘खरे नाव आणि धर्म प्रेयसीला न सांगणे, याला प्रेम म्हणता येईल का ?’ त्यामुळे प्रेम करतांना खरे नाव आणि धर्म न सांगणार्याला कायद्यानुसार कारागृहात जावेच लागेल. मग तो अभिनेता किंवा राजकारणी कुणीही असो ! झिशान अय्युब यांनी असे काही करून कुठल्या हिंदु मुलीला फसवले आहे; म्हणून त्यांना भीती वाटत आहे का ? तसे नसेल, तर त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही.
नीतीमत्ता विसरलेले सुशिक्षित धर्मांध !
अशा प्रकरणांची ताजी घटना सांगायची, तर बागपत (उत्तरप्रदेश) येथे एक विवाहित मुसलमान डॉक्टर अक्रम याने हिंदु असल्याचे सांगत एका हिंदु परिचारिकेला विवाहाचे आश्वासन देत तिचे ७ मास लैंगिक शोषण केले. डॉक्टर ही व्यक्ती आपण सुशिक्षित आणि नीतीमत्ता असलेली समजतो; परंतु ‘लव्ह जिहाद’ करण्यासाठी या डॉ. अक्रमने डॉक्टर या पेशालाच काळीमा फासणारी कृती केली. ती परिचारिका गर्भवती राहिल्यावर याच डॉ. अक्रमने तिला ‘गर्भपात कर’ असे सांगून तिच्या पोटावर लाथ मारली. त्याने तिच्याशी ठेवलेल्या शारीरिक संबंधांचा अश्लील ‘व्हिडिओ’ही बनवला आणि गप्प रहाण्यास धमकावले. यातून तो ‘लव्ह जिहाद’साठी किती आसुरी वृत्तीने वागला, तेही दिसून आले. ‘लव्ह जिहाद’ रोखणार्या कायद्याविषयी मुसलमानांच्या मनात सरकारविषयी भीती निर्माण होईल, असे वक्तव्य करणार्या झिशान अय्युब यांना डॉ. अक्रम यांच्या नीच वागणुकीविषयी काय म्हणायचे आहे ? हिंदु मुलींनी हेच सहन करायचे, असे त्यांना वाटते का ?
आंतरधर्मीय विवाहाचे धोके !
रशिया हा साम्यवादी, तसेच ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती देश म्हणून ओळखला जातो. असे असूनही रशियाने गेल्या आठवड्यात मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यावर बंदी घातली. तेथील मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला. या वेळी त्यांनी ‘आंतरधर्मीय विवादास्पद विवाहांमुळे अनेक समस्या उद्भवतात’, असे म्हटले आहे. यामुळे मुलांचे संगोपन करण्यातही अडचण येते, वारंवार गैरसमज झाल्यामुळे हे विवाह काही वर्षांनी मोडतात आदी निरीक्षणे या सल्लागार मंडळाने नोंदवली आहेत. भारतात आंतरधर्मीय विवाहाला मान्यता आहे; पण विवाहापूर्वी जर तुम्ही धर्म लपवणार असाल आणि नंतर हिंदु मुलींना इस्लाम स्वीकारण्यास बळजोरी करणार असाल, तर अशी फसवणूक रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा हवाच !
काँग्रेसी राजकारणी हिंदु मुलींचे शत्रूच !
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याविषयी जेवढे आक्रमक होऊन बोलले, तेवढे हिंदु मुलींच्या धर्मांधांकडून झालेल्या फसवणुकीविषयी कधी बोलले नाहीत. हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांधांनी नंतर त्यांना दलालांच्या मार्फत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचीही उदाहरणे आहेत. ही गोष्ट काँग्रेसवाले सर्वसाधारण फसवणुकीचा गुन्हा मानतात; पण अशा काही घटनांत हिंदु मुलीची फसवणूक करतांना धर्मांधाने त्याची मूळ ओळख लपवून तो हिंदु असल्याचे भासवणे, हा त्याचा सर्वांत मोठा गुन्हा ठरतो. भारतातील गावांमधील बहुतांश हिंदु मुली हिंदु मुलाशीच प्रेम करू इच्छितात; म्हणजेच या मुली मुलाचा धर्म पाहूनच त्याच्यावर प्रेम करतात आणि याच कारणास्तव धर्मांध स्वतः हिंदु असल्याचे नाटक करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. झिशान अय्युब यांच्यासारख्यांनी किंवा काँग्रेसवाल्यांनी वाटल्यास धर्म पाहून प्रेम करू नये; पण हिंदु मुलींना धर्म न पहाता प्रेम करण्यास सांगण्याचा त्यांना अधिकार नाही.
राज्यघटनेत आवश्यक ते पालट करा !
गेहलोत यांनी या कायद्याला राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगतांना ‘हा कायदा न्यायालयातही टिकणार नाही’, असे म्हटले आहे. त्यांचे हे सूचक विधान लक्षात घेऊन राज्यघटनेतही आवश्यक ते पालट करण्याचा विचार केंद्रशासनाला करावा लागेल. काँग्रेसने आतापर्यंत अनेक घटनाविरोधी कृत्ये केली आहेत. यासाठी त्यांनी देशात आणीबाणीही लादली. त्यामुळे हिंदूंच्या हितासाठी कायदे करतांना मोदी सरकारवर ‘ते हुकूमशहा आहेत’, ‘राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आली आहे’, असे अनेक आरोप होतील. यासह सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावही येईल; पण मोदी सरकारने या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हिंदु मुलींची अब्रू वाचवणारा, त्यांची दलाली रोखणारा आणि प्राण वाचवणारा कायदा येण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते पालट करावेत, अशी तमाम हिंदूंची अपेक्षा आहे !