निकालांच्या २ दिवसांनंतरही मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात काँग्रेसला अपयश !

मागील मासात झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून २ दिवस उलटूनही काँग्रेसला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात अपयश आले.

भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष ! – शरद पवार

४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल पहाता भाजपविषयी लोकांनी स्पष्ट असंतोष व्यक्त केला आहे. या निकालाविषयी भाजप सोडून अन्य पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मुख्यमंत्रीपदावरून मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन

मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांत सत्ता मिळाल्यानंतर तेथील मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेत्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन ! सत्ता मिळाल्याच्या दिवसापासूनच काँग्रेसमधील सुंदोपसुंदी दिसू लागली आहे. पुढील ५ वर्षांत ते कशा प्रकारचा कारभार करणार आहेत, हे आताच कळून येते !

मध्यप्रदेशात बसप आणि सप यांच्या समर्थनामुळे काँग्रेस सत्तास्थापन करणार

मध्यप्रदेशात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.

आतातरी अंतर्मुख होणार का ?

३ राज्यांतील पराभवाच्या कारणांचे स्पष्टीकरण देतांना भाजपच्या ‘१५ वर्षांनी सत्तापालट होतोच’ आदी विविध कारणे भाजपकडून आता दिली जातील. काही प्रमाणात ती रास्तही असतील;

(म्हणे) ‘भाजपच्या नकारात्मक राजकारणाचा पराभव !’ – सोनिया गांधी

‘भाजपच्या नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे’, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली आहे.

सनातन संस्थेच्या विरोधात अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करणार्‍या ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक, संचालक, तसेच काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून ‘सनातनचं नाव, मोदी – फडणवीसविरुद्ध डाव?’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता, नगर महापालिका त्रिशंकू

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ५० जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला १४ जागांवर समाधान मानावे लागले.

कोल्हापूर येथे महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे, उपमहापौरपदी भूपाल शेटे !

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या विजयी झाल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now