Sadhvi Pragya Singh : मालेगाव येथे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्यानिमित्त विराट हिंदु संत संमेलन !
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च या दिवशी होणार्या विराट हिंदु संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अनुमती दिली आहे; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता उच्च न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या आहेत.