प्रेमात जिहादला कोणतीही जागा नसल्याचाही दावा !
|
नवी देहली – देशाला विभागण्यासाठी आणि धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. (‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात आहे’, असे विधान केरळमधील तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन् यांनीच केले होते आणि ते भाजपचे नव्हते, हे गेहलोत कसे काय विसरतात ? – संपादक) अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे. हा कायदा न्यायालयातही टिकणार नाही. प्रेमात जिहादला कोणतीही जागा नाही, असे ट्वीट राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या भाजपशासित राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी भाजपवर ही टीका केली आहे.
(सौजन्य : INDIATv)
गेहलोत यांनी पुढे म्हटले की,
१. भाजपकडून देशात असे वातावरण सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे, ज्यामध्ये सहमतीने एकत्र येणार्या सज्ञान व्यक्तींनाही सत्तेच्या दयेची याचना करावी लागेल. (येथे सहमतीने एकत्र येणार्या सज्ञान व्यक्तींचा विरोध नाही, तर त्याच्या नावाखाली होणार्या फसवणुकीचा विरोध आहे, हे गेहलोत यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)
“Marriage is a matter of personal liberty, bringing a law to curb it is completely unconstitutional & it will not stand in any court of law. Jihad has no place in love,” Ashok Gehlot wrote.https://t.co/l4eXBeihJo
— The Indian Express (@IndianExpress) November 20, 2020
२. विवाह हा सर्वस्वी खासगी निर्णय आहे आणि हे त्यावरच अंकुश लावू इच्छितात. वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे. (विवाह हा खासगी निर्णय असला, तरी त्यामध्ये कुणाची फसवणूक होत असेल, तर तो गुन्हा आहे, हे गेहलोत यांना ठाऊक नाही का ? कि ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत ? – संपादक)
३. धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा, सामाजिक तणाव वाढवण्याचा आणि राज्यघटनांमधील तरतुदींचे उल्लंघन करण्याचा हा भाजपचा एक कट दिसत आहे. राज्य कोणत्याही आधारावर नागरिकांसमवेत भेदभाव करत नाही. (धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे सर्वाधिक काम काँग्रेसने गेल्या ७२ वर्षांत केले आहे, तेवढे अन्य कुणीच केले नसेल ! काँग्रेसच्या काळात देहलीमधील शीखविरोधी दंगलीत साडेतीन सहस्र शिखांना ठार करण्यात आले, त्याविषयी गेहलोत का बोलत नाही ? कि त्यांना ही कत्तल धार्मिक सौहार्द वाटते ? – संपादक)