(म्हणे) ‘लहान मुलांच्या घटनांना महत्त्व देऊ नये !’

भाजपचे आमदार धानसिंह रावत यांच्या मुलाने त्याच्या गाडीला ‘ओव्हरटेक’ करण्यास न दिल्याने एका वाहनचालकाला मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. याविषयी रावत प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले की, ही गोष्ट लहान आहे.

हिंदूंच्या संघटितपणामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी सातत्याने आक्रमणे झाली, तरीही आपल्यातील धगधगीमुळे ती टिकून राहिली. तरुणांनी स्वतःतील शक्ती ओळखायला हवी. त्यांनी त्यांचे पौरुषत्व परिष्कृत करायला हवे. त्यासाठी त्यांनी शास्त्र आणि शस्त्र शिकायला हवे.

कलंकित साधूंना भरचौकात फाशी दिली पाहिजे ! – योगऋषी रामदेव बाबा

देशात साधूसंतांची एक परंपरा आहे. त्या परंपरेला कोणीही धक्का लावू नये. सध्या साधूच्या वेशातील काही लोक साधूसंतांना कलंकित करत आहेत.

राजस्थानच्या शाळांमध्ये भरणार साप्ताहिक संस्कारवर्ग !

शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावेत; म्हणून येत्या जुलैपासून प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये संस्कारवर्ग भरवले जाणार आहेत.

साधूसंतांवरील बलात्काराच्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या साधूने स्वत:चे लिंग छाटले !

सध्या देशात साधूसंतांवर सातत्याने बलात्कार आणि विनयभंग यांचे आरोप होत आहेत. यामुळे व्यथित झालेल्या येथील सेवागिरी धाममधील अनिल पुरोहित (वय ४० वर्षे) नावाच्या एका साधूने स्वत:चे लिंगच छाटले.

श्री राजपूत करणी सेनेची राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांचे कान आणि नाक कापण्याची चेतावणी

श्री राजपूत करणी सेनेने राजस्थानच्या शिक्षणमंत्री किरण माहेश्‍वरी यांचे नाक आणि कान कापण्याची चेतावणी दिली आहे. माहेश्‍वरी यांनी राजपुतांची तुलना उंदरांशी केल्याने ही चेतावणी देण्यात आली आहे, तसेच त्यांना क्षमा मागण्यास सांगितले आहे.

राजस्थानमधील भाजप सरकार गोरक्षणासाठी निधी जमा करण्यासाठी मद्यावर कर लावण्याच्या विचारात !

मुद्रांकांवर अधिभार लावूनही गोरक्षणासाठी पुरेसा निधी जमा होत नसल्याने आता राजस्थान सरकार मद्यावर ‘सेस’ (कराचा एक प्रकार) लावण्याचा विचार करत आहे.

धर्मांधाकडून अल्लाहला खूश करण्यासाठी मुलीची हत्या

रमजानच्या मासात अल्लाला खूश करण्यासाठी नवाब कुरेशी या नराधम बापाने शुक्रवारी, ८ जूनला स्वत:च्याच चार वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याची घटना राजस्थामधील जोधपूर शहरात घडली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

(म्हणे) ‘अमली पदार्थाऐवजी सोन्याची तस्करी करा, त्यात  लगेच जामीन मिळतो !’ – राजस्थानमधील भाजपचे आमदार अर्जुनलाल गर्ग

अमली पदार्थांची तस्करी हा अजामीनपत्र गुन्हा आहे; पण सोन्याची तस्करी करतांना अटक झाल्यास अतिशय सहज जामीन मिळतो. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी न करता सोन्याची तस्करी करा, असे विधान राजस्थानमधील बिलारा……

राष्ट्रपतींच्या कथित अवमानावरून पुष्कर (राजस्थान) येथील ब्रह्मा मंदिरात पुजार्‍यावर आक्रमण

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद १४ मे या दिवशी पुष्कर येथील ब्रह्मा मंदिरात दर्शनाला आले होते. त्यांच्या पत्नीला गुडघ्याचा त्रास असल्याने कोविंद यांनी मंदिरांच्या पायर्‍यांवरच पूजा केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now