महाराष्ट्रात इयत्ता १० वीपर्यंत मराठी विषय अनिवार्य येत्या अधिवेशनात कायदा करणार ! – सुभाष देसाई, मराठी भाषा मंत्री

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १० वीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात यासाठी विधेयक मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा होऊन २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिना’ला याचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री…

केंद्रशासनाच्या अखत्यारीतील कार्यालयांनी त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा उपयोग करावा ! – सुभाष देसाई यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

राज्याच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांना त्रिभाषा सूत्र लागू आहे; मात्र केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रिभाषा सूत्राचे पालन करत नाहीत. राज्यातील केंद्रशासनाच्या अखत्यारीतील कार्यालये, अधिकोष, रेल्वे, टपाल सेवा आदी कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा उपयोग सक्तीचा करावा, अशी मागणी…

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना व्यासपिठावर स्थान नाही

येथे झालेल्या ९३ व्या मराठी साहित्य संमेलन अराजकीय करण्यासाठी व्यासपिठावर कोणत्याही राजकीय नेत्याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार, तसेच शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष संमेलनाला अनुपस्थित राहिले……….

खानापूर (कर्नाटक) येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून जाणार्‍या साहित्यिकांना बेळगावमध्येच थांबवले

कर्नाटकातील खानापूर तालुक्यातील इदलहोड येथे ‘गुंफण मराठी साहित्य संमेलन’ होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून साहित्यिक जाणार होते; मात्र पोलिसांनी त्यांना बेळगावमध्येच थांबवले…..

धाराशिव येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरी येथे १० जानेवारीपासून चालू झालेल्या ३ दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप १२ जानेवारी या दिवशी करण्यात आला. समारोप प्रसंगी एकूण २० ठरावांचे वाचन करण्यात आले; मात्र अनेक मराठीप्रेमी आणि सावरकरप्रेमी यांची मागणी असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला नाही.