सिंधुदुर्ग आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघड
शासकीय रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि येथे केल्या जाणार्या उपचारांवर जनता विश्वास ठेवून असते; मात्र आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.