निवडणूककाळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे सामाजिक संकेतस्थळांकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार प्रचारासाठी सामाजिक संकेतस्थळाचा वापर करत आहेत. एकमेकांविरुद्ध आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून पोलीस सामाजिक संकेतस्थळांकडे लक्ष ठेवून आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील नव्या तरतुदीविषयीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारीतील तथ्यांची शहानिशा करूनच गुन्हा प्रविष्ट करावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च २०१८ या दिवशी दिला होता.

पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह ४० कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

नागपूर येथे गोवंशांचे १३ टन मांस पकडले

जुनी कामठी परिसरातील पशूवधगृहातून गोवंशाचे १९ लाख रुपयांचे १३ टन मांस पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध इर्शाद अहमद आणि मोहम्मद जावेद खान या दोघांना अटक केली. गोवंशियांंची सर्रासपणे होणारी हत्या रोखण्यासाठी सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे आवश्यक !


Multi Language |Offline reading | PDF