पनवेल येथे व्यावसायिकांकडून नदीपात्रात भराव !

पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता

प्रतिकात्मक चित्र

पनवेल – काळुंद्रे गाव आणि तक्का गाव येथून जाणार्‍या गाढी नदीच्या पात्राजवळ, तसेच नदीपात्रात व्यावसायिकांनी प्रचंड प्रमाणात भराव टाकला आहे. यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात परिसरातील गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे बेकायदा भराव टाकणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे पक्षाने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.