सनातनच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद ! – प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी गुरुवार, १९ सप्टेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट दिली.

हिंदु जनजागृती समितीकडून ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचेे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची त्यांच्या बालीघाई येथील आश्रमात भेट घेतली.

हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

श्री नीलकंठेश्‍वर महादेव मंदिर ब्रह्मचारी संस्थान, उटी, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांनी २ सप्टेंबर या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अ‍ॅप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे ! – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, फैजपूर (जळगाव)

भारतवर्षातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव चालू असून कोणताही उत्सव धर्मशास्त्र आणि संस्कृती यांना अनुसरून साजरा केल्यानेच सर्व संकटे दूर होतात, म्हणून धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सण साजरा करा, असा संदेश स्वामीजींनी या वेळी दिला.

प.पू. आबा उपाध्ये यांनी भस्म लावल्यावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी यांना आलेल्या अनुभूती !

  ‘पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचे देवद आश्रमात २३ ते २८.६.२०१९ या कालावधीत वास्तव्य होते. २४.६.२०१९ या दिवशी त्यांनी देवद आश्रमातील सर्व साधकांना त्यांच्याकडील भस्म (विभूती) लावले.

प.पू. दास महाराज यांना सर्वार्थाने साथ देणार्‍या आदिशक्तीस्वरूप पू. (सौ.) लक्ष्मी नाईक !

सौ. माई माझ्या जीवनात आल्यापासून त्यांनी मला अनमोल साथ दिली. त्रेतायुगातील अत्रीऋषींच्या पत्नी अनसूयेप्रमाणेच कलियुगातील ही माझी पत्नी केवळ पत्नी नसून साक्षात आदिशक्तीचे स्वरूप आहे. सौ. माईंच्या विषयी कितीही लिहिले, तरी ते अपूर्णच आहे, तरीही मी गुरुचरणी प्रार्थना करून सौ. माईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लेख लिहीत आहे.

लवकरच हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी

शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांची सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी भुसावळ येथे नुकतीच भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

गोव्यातील साधिका श्रीमती स्मिता राव यांना प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रत्यक्ष लाभलेला सत्संग आणि या सत्संगांत त्यांनी दिलेली अनमोल शिकवण !

‘माझी आई लहानपणी मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला सांगत असे. ती श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ग्रंथातील उदाहरण देऊन सांगायची, ‘‘ते नामजप करतात; म्हणून देव त्यांना साहाय्य करतो. तूही नामजप कर.’’

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दादर (मुंबई) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे १३ मार्च २०१९ ते १३ मार्च २०२० हे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन

आशीर्वादाच्या रूपाने आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारे पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये यांचे २१ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.


Multi Language |Offline reading | PDF