शनिशिंगणापूर येथील प्रसाद वाटपाची परंपरा बंद करणे चुकीचे ! – ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

देवाच्या दर्शनानंतर प्रसाद दिला जातो. त्यातून चैतन्य आणि शक्ती मिळते, तसेच त्या देवतेविषयीची भक्ती वाढते. तेव्हा प्रसाद देणे चालूच ठेवले पाहिजे. प्रसाद बंद करून झाडे लावायला देणे म्हणजे हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा बंद करणे होय. या पातकापासून दूर रहावे. राष्ट्रीय वारकरी परिषद याचा जाहीर निषेध करत आहे.

बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पूर्ववत् बांधून द्यावा अन्यथा कठोर पावले उचलू ! – ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि अनेक साधू-संत यांचे आशीर्वाद राज्य चालवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचे दायित्वही शासनाचेच आहे.


Multi Language |Offline reading | PDF