सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !

  • आळंदी येथे हिंदुद्वेषी शाम मानव आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात समस्त वारकरी संप्रदायाची जनआंदोलनाद्वारे मागणी !

  • आळंदी येथील पोलीस ठाण्यात ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

 

जनआंदोलनात सहभागी वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ

आळंदी (जिल्हा पुणे), २८ सप्टेंबर (वार्ता.) – जादूटोणाविरोधी शासकीय समितीचे उपाध्यक्ष शाम मानव यांची सरकारने जादूटोणाविरोधी शासकीय समिती पदावरून ४८ घंट्यांत हकालपट्टी करावी, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या जनआंदोलनाद्वारे करण्यात आली.

वारकरी संप्रदायाच्या वतीने येथे करण्यात आलेले जनआंदोल

संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या वेळी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता चाकण चौक, आळंदी येथे जनआंदोलन घेण्यात आले. ११० हून अधिक वारकरी आणि विविध हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

जादूटोणाविरोधी शासकीय समिती तात्काळ विसर्जित करावी ! – ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के

आंदोलनात ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के म्हणाले की, श्याम मानव हे मानव नसून ते दानव आहेत. जादूटोणाविरोधी समितीवर शासनाने कोट्यवधी रुपये व्यय केले आहेत. त्या पैशांवर मानव मजा मारत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी शासकीय समिती तात्काळ विसर्जित करावी. शाम मानव यांना शासकीय समितीतून ४८ घंट्यांच्या आत हकालपट्टी करावी. महाराव यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ वारकर्‍यांवर येऊ नये.’’

ज्ञानेश महाराव यांना मूकसंमती देणार्‍यांचा निषेध ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महराज

ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महराज म्हणाले की, धर्मद्रोही ज्ञानेश महाराव यांचे नाव ज्ञानेश नाव का ठेवले आहे ? हा बिग्रेडी विचारसरणीचा घाणेरडा माणूस आहे.  ज्ञानेश महाराव व्यासपिठावरून प्रभु श्रीराम आणि संत यांचा अवमान करत असतांना ‘जाणते राजे’ तेथे उपस्थित होते, तसेच अन्य काही थोर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यांनी ज्ञानेश महाराव यांना मूकसंमती दिली. त्याचा आम्ही निषेध करतो.

वारकर्‍यांच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट ! 

ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वारकरी संप्रदायांच्या वतीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट केली आहे. या वेळी पोलीस उपनिरीक्षक नरके यांनी तक्रार प्रविष्ट करून या प्रकरणाची २ दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. या वेळी गोरक्षक श्री. गणेश हुलावले, ‘समर्थक ज्ञानपिठा’चे ह.भ.प. मस्के महाराज, श्री. प्रसाद जोशी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे चोरगे महाराज, आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज उंदरे पाटील, ह.भ.प. राममहाराज सूर्यवंशी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले हे उपस्थित होते.

श्याम मानव यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पुढील भूमिका घोषित करू ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर

ह.भ.प. बापू महाराज रावकर

ह.भ.प. बापू महाराज रावकर म्हणाले की, वारकरी अतिशय ज्ञानी असतात. समाजाचे प्रबोधन करणार्‍यांना जादूटोणाविरोधी समितीत घेतले पाहिजे, अशी विनंती आम्ही केली होती. ही विनंती मान्य न केल्यास महाराष्ट्रात आंदोलन करावे लागेल. धार्मिक भावना दुखावल्यानंतर आतापर्यंत शासनाने कारवाई करायला हवी होती, ती केली नाही. शाम मानव यांची ४८ घंट्यांत कारवाई झाली नाही, तर आम्ही पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका घोषित करू.

आमच्या आराध्य देवतांवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! – ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, प्रवचनकारक

ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर

श्याम मानव यांची जादूटोणाविरोधी समितीमधून हकालपट्टी करून समिती विसर्जित करावी, अशी मागणी सर्व वारकरी करत आहोत. ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने शासनाची मागणी आहे की, आमच्या आराध्य देवतांवर टीका करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही.

प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल ! – ह.भ.प. बाळासाहेब थोरात

हिंदु देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.