Aligarh Muslim University : अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाकडून ‘होळी मिलन’ कार्यक्रमाला अनुमती

हिंदु विद्यार्थी आणि संघटना यांच्या प्रखर विरोधाचा परिणाम !  

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात हिंदु विद्यार्थी आणि संघटन यांच्या विरोधानंतर विश्‍वविद्यालय प्रशासनाने होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यास अनुमती दिली आहे. विश्‍वविद्यालयाचे प्रा. बी.बी. सिंह यांनी सांगितले की, १३ आणि १४ मार्च या दिवशी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील कोणताही विद्यार्थी सभागृहामध्ये येऊन होळी खेळू शकतो. ते विद्यार्थ्यांसाठी २ दिवस खुलेे रहाणार आहे. येथे रंग आणि गुलाल यांची उधळण करून मजा करा.

हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !

१. काही दिवसांपूर्वीच हिंदु विद्यार्थ्यांनी विश्‍वविद्यालयातील सभागृहामध्ये होळी मिलन कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रशासनाकडे अनुमती मागितली होती; मात्र प्रशासनाने अनुमती देण्यास नकार दिला होता.

२. या नकाराचा अखिल भारतीय करणी सेना, भाजपचे येथील खासदार सतीश गौतम आदींनी विरोध करत अनुमती देण्याची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका 

हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !