मैत्रिणीसमवेत रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीकडून पैसे उकळल्याने २ पोलीस कर्मचारी निलंबित !
विधी महाविद्यालय रस्त्यावर मैत्रिणीच्या समवेत चारचाकी गाडीमध्ये गप्पा मारत थांबलेल्या व्यक्तीला धमकावून २० सहस्र रुपये घेणार्या डेक्कन पोलीस ठाण्यातील २ कर्मचार्यांना निलंबित करण्याचे आदेश ‘परिमंडळ एक’चे प्रभारी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले.