पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर कोविड-१९ च्या संदर्भाने कोणताही उल्लेख नसेल ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी विद्यापिठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सिद्धता केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड – १९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल.

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत; मात्र कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

विधानभवनामध्ये कोरोना संक्रमित अधिकारी वावरला  

कोरोना संक्रमित असलेला कक्ष अधिकारी विधानभवनात वावरला असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनात येणारे आमदार, तसेच अधिकारी यांची आधीच कोरोनाची चाचणी करून अहवाल निगेटिव्ह असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे.

आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

७ सप्टेंबर या दिवशी आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी नरवीर रामे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेत हक्कभंग

मुंबईविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर हक्कभंग ठराव आणण्याची मागणी ८ सप्टेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा हक्कभंग स्वीकारला.

मुंबईतील लोकलगाड्या, कार्यालये १ नोव्हेंबरपासून चालू होण्याची शक्यता

मुंबईतील लोकलगाड्या आणि कार्यालये १ नोव्हेंबरपासून, तर शाळा १ जानेवारीपासून चालू होऊ शकतात, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टी.आय.एफ.आर्.) व्यक्त केला आहे.

केंद्र सरकार अभिनेत्री कंगना रणावत यांना ‘वाय प्लस’ श्रेणीतील सुरक्षा देणार

कंगना राणावत यांनी ‘येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत येत असून मला रोखून दाखवा’, असे आव्हान दिले होते. कंगना राणावत यांच्या मुंबईविषयीच्या विधानामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने केंद्र सरकारने राणावत यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुसत्या खाटा आणि औषधे दिली म्हणजे झाले नाही, रुग्णसेवा चांगली पाहिजे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. नागरिकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरूक रहावे. त्यामुळे कोरोनाचे संकट आपण रोखू शकतो. महाराष्ट्रासाठी पुढील ३ मास आव्हानात्मक आहेत. औषध नसले, तरी उत्कृष्ट रुग्णसेवा आवश्यक आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार १३ नवीन विधेयके

७ सप्टेंबरपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर असे २ दिवस चालणार आहे. यामध्ये केवळ अध्यादेश पटलावर ठेवणे, वर्ष २०२०-२१ च्या पुरवणी मागण्या सादर करणे आणि त्यावर चर्चा, शासकीय कामकाज आणि शोकप्रस्ताव, असे कामकाज होणार आहे.

मुंबईत भूकंपाचे सौम्य धक्के

मुंबईत ५ सप्टेंबर या दिवशी अनुमाने सकाळी साडेसहा वाजता २.७ रिश्टर स्केल एवढे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यांचा कोणताही मोठा परिणाम जाणवला नाही. मुंबईच्या उत्तरेला ९८ किमी अंतरावर समुद्र किनार्‍यालगत १० कि.मी. अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली.