Sadhvi Ritambhara : श्रीराममंदिरानंतर भारतातील प्रत्येक गावात भगवा फडकावणे, हे उद्दिष्ट ! – साध्वी ऋतुंभरा
महाकुंभमेळ्यात अनेक संप्रदाय आहेत. कुणी महाप्रसाद वाटत आहे, कुणी साहित्य वाटत आहे, कुणी प्रवचने-कथा यांद्वारे ज्ञानामृत वाटत आहे. हे सर्व आवश्यक आहे; मात्र सध्या हिंदु समाजाला शौर्यवाटप करणे आवश्यक आहे. शौर्यासाठी धैर्य आवश्यक असते. शौर्य-धैर्य असेल, तर अनुकुलतेत आणि प्रतिकुलतेतही स्थिर रहाता येते.