रतलाम (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेल्या वह्या वाटल्याच्या प्रकरणी प्राचार्य निलंबित !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेल्या वह्या शाळेत वाटप न करण्यासाठी हा काय पाकिस्तान आहे का ? देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या क्रांतीकारकाचा स्वातंत्र्यानंतर असा द्वेष केला जाणे, हे संतापजनक होय ! काँग्रेसच्या सावरकरद्वेषाची ही परिसीमा आहे ! अशा प्राचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता राष्ट्रप्रेमींनीच पुढे येणे आवश्यक !

पुण्यातील स.प. महाविद्यालयात ‘डे’ साजरे करण्यास प्रतिबंध

सर परशुरामभाऊ (स.प.) महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयात ‘डे’ साजरे करण्यास प्रतिबंध केला आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ‘चॉकलेट डे’, ‘साडी डे’, ‘मिसमॅच डे’ आदी ‘डे’ साजरे केले जाणार होते.

राज्यातील इंग्रजी शाळांमध्ये १ ली ते १० वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज्यातील इंग्रजी शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

‘साम्यवाद्यांनी देशभरातील शिक्षण संस्थांचे वातावरण दूषित (खराब) केले !’

सरकारने शिक्षक आणि कुलगुरु यांच्या पत्राची नोंद घेऊन साम्यवादी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित विद्यापिठे यांच्यावर तात्काळ बंदी घालावी, हीच राष्ट्रप्रेमी आणि शिक्षणप्रेमी यांची अपेक्षा !

राजकारण्यांना मुसलमानांचा वापर करून घेण्याचा रोग जडला आहे ! – साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा

मुसलमानांचा वापर करून राजकारण करणे, हा ब्रिटिश आणि काँग्रेस यांना जडलेला रोग होता. अजूनही मुसलमानांचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. मुसलमानांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा रोग जडला आहे, असे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एस्.एल्. भैरप्पा यांनी म्हटले.

दूध आणि अन्न यांतील भेसळ ओळखण्याच्या प्रशिक्षणाचा शालेय शिक्षणात अंतर्भाव केला जावा !

येथे ७ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत आरोग्य सहाय्य समितीच्या वतीने सदाशिव पेठेतील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)चे संचालक श्री. दिनकर पाटील यांना निवेदन देण्यात आले.