प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ या वर्षीही १०० टक्के यशस्वी !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग २१ वर्षे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. रासायनिक रंग खेळून खडकवासला धरणात उतरणार्या नागरिकांचे मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्याचे हे अभियान या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.