डोळ्यांचे पारणे फेडणारा श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव !
जोतिबा देवाची यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी चैत्र मासात श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव साजरा केला जातो. हा रथोत्सव ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, नेत्रदीपक रोषणाईमध्ये ‘उदं गं अंबे उदं’, चा जयघोष करत प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला.