आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

सुनेचे पाय धरल्यामुळे पुण्य सासूला मिळणे; पण सुनेची अधोगती होणे

‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्‍वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये

‘विचार’ या शब्दाचा भावार्थ !

‘मनात विचार आल्यास त्यांचा कधी विचार करू नये. आपल्या मनात ताण देणारे अनावश्यक विचार आल्यास मार्गदर्शकांना लगेचच विचारून घ्यावे…..

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चेन्नई येथील साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन

‘देवाने आपल्याविषयी विचार करावा’, असे काहीतरी आपण करायला हवे. सत्सेवा केल्यामुळे ती स्पंदने देवापर्यंत पोचतात. आपण कर्मकांडानुसार करत असलेली देवाची आरती ही बाह्य ज्योत आहे, तर ‘सेवा’ ही अंतर्ज्योत आहे. आपल्याला अंतर्ज्योतीने देवाची आरती करायची आहे.

आपण कुठेही असलो, तरी आपल्या मनातील विचारांवर ‘आपण मायेत आहोत कि देवाच्या अनुसंधानात आहोत’, हे अवलंबून असते !

. . . ईश्‍वरापासून दूर जाऊन काहीही करणे, म्हणजे ‘माया’ आहे. त्यामुळे आपण आश्रमात असलो, घरी असलो किंवा अजून कुठेही असलो, तरी आपल्या मनातील विचारांवर ‘आपण मायेत आहोत कि देवाच्या अनुसंधानात आहोत’, हे अवलंबून असते.’ – सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

नवस

‘कुटुंबातील नवरा-बायकोतील कोणीही कुटुंबासाठी कुठलाही नवस बोलतांना ‘आम्ही’ असा शब्द वापरावा. नवस आज एक, तर उद्या दुसरा उतरवणे, असे वेगळे केले पाहिजे. कुठल्याही नवसामध्ये नवसांचा एकत्रितपणा नको.’ – प.पू. आबा उपाध्ये

धर्माची हानी रोखण्यासाठी आचारधर्माचे पालन करावेच लागेल ! – करवीरपीठाधीश्‍वर

आपला धर्म हा भोग घेण्यासाठी नाही, तर त्याग करण्यासाठी आहे. ‘ब्राह्मण त्यांच्या कर्तव्यांचे पालन करतात का ?’ याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. भूषा, भाषा आणि भोजन यांत ब्राह्मण समाजातील काही लोकांचे पतन होत आहे. पुरातन काळापासून ब्राह्मण समाजावरच धर्मपरंपरा जोपासण्याचे दायित्व असून धर्माची हानी रोखण्यासाठी आपल्याला आचारधर्माचे पालन करावेच लागेल, असे परखड मत करवीरपीठाधीश्‍वर विद्यानृसिंहभारती यांनी १२ जानेवारी या दिवशी व्यक्त केले.

जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंदजी सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भव्य ‘सनातन धर्म संमेलन’

शंकराचार्य श्री निश्‍चलानंदजी सरस्वती महाराज यांचे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत जळगाव शहरात आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे