हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत.

साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा !

‘निर्विचार’ नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी)वर उपलब्ध !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान

व्याख्यानात सहभागी होण्यासाठी : https://youtu.be/QhnTQWehdyc या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’ने या याचिकेवर युक्तीवाद करण्याची सिद्धता दर्शवली असून या याचिकेवरील सुनावणी ८ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र शौर्यजागृती शिबिरा’ मध्ये विविध जिल्ह्यांतील ६३५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

युवा साधकांनी प्रत्येक कृती साधना आणि धर्माचरण म्हणून करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय ‘ऑनलाईन’ युवा साधक सत्संगाचे आयोजन..

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’

हिंदूंना देशात सन्मानाने रहाता यावे, यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील राष्ट्रप्रेमी नागरिक अन् जिज्ञासू यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

खराब ‘टाइम’

‘टाइम’ने सांगितल्यामुळे या वर्षी फेसबूककडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची अनेक पाने बंद करण्यात आली. एका राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनेच्या सामाजिक संकेतस्थळांच्या पानांवर बंदी घालण्याची मागणी करणे ही ‘टाइम’ची दादागिरी नाही का ?

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात नियतकालिके आणि सनातन शॉप यांच्या फेसबूक पानांवरील मजकुराची वस्तुनिष्ठ शहानिशा न करताच फेसबूककडून ही अन्याय्य कारवाई करण्यात आली, हे लक्षात घ्या !