महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! हे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, तर केंद्र सरकार, तसेच अन्य भाजप शासित राज्ये यांनाही ते सहज शक्य असणार, यात शंका नाही !

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी अ‍ॅप ‘कू’च्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !

धाडसी पाऊल !

देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !

योगी आदित्यनाथ यांच्या परिश्रमामुळेच उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशसाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आज उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

अभिनंदनीय निर्णय !

आदर्श शासनकर्त्याचे मापदंड योगी त्यांच्या कृतीतून घालून देत आहेत. योगीजींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या स्तरावर समान नागरी कायदा व्हावा आणि त्याची कार्यवाहीही तत्परतेने व्हावी, ही अपेक्षा आहे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !

वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते ! – योगी आदित्यनाथ

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यावर काहीच प्रयत्न न केल्याने आज देश लोकसंख्या विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केल्यास थोडातरी परिणाम होईल, अशीच अपेक्षा करता येईल !

अयोध्येच्या विकासाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.