Mathura Holi No Muslim Entry : मथुरेच्या होळीमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घाला ! – संतांची मागणी  

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरेमध्ये मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी येथील ब्रजमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी मथुरेतील संतांनी केली आहे. संतांचे म्हणणे आहे की, ब्रजची होळी पहाण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक मथुरेत येतात. होळीच्या दिवशी ब्रजमध्ये मुसलमान कशाला हवेत ? ते काय करतात ? ब्रजमध्ये प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यासारखा कायदा लागू करा. मुसलमानांनी येथे होळीच्या वेळी येऊ नये.

 

भाजपच्या आमदारांचा पाठिंबा!

संतांच्या मागणीला बिहारमदील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, जे आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना अशा कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यापासून रोखले पाहिजे. ज्यांच्या मदरशांमध्ये असे शिकवले जाते की, ‘चेहर्‍यावर रंग लावला, तर अल्ला शिक्षा देईल’, त्यांनी रंगांच्या उत्सवात जाऊ नये. आमच्या देवतांवर विश्वास न ठेवणार्‍या आणि आमचा द्वेष करणार्‍या मुसलमानांनी सनातन संस्कृतीचा उत्सव साजरा होणार्‍या ठिकाणी जाऊ नये.

ब्रजमधील होळी प्रसिद्ध !

ब्रजमधील होळीच्या उत्सवात देशभरातील आणि जगभरातील भाविक सहभागी होतात. येथील होळी उत्सव काही दिवस आधीच प्रारंभ होतो. येथे मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. होळी खेळण्यासाठी लोक लांबून येथे येतात. राधेचे जन्मस्थान असलेल्या बरसाना येथून ही होळी चालू होते. बरसानाची लठमार होळी ही भगवान श्रीकृष्णाने त्याच्या काळात केलेल्या लीलांचा एक भाग मानली जाते.

मुसलमानांच्या हेतूंमुळे आम्हाला अजूनही धोका ! –  धर्म रक्षा संघ

धर्म रक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सौरभ गौड म्हणाले की, उत्तरप्रदेशातील बरेलीतील अलीकडच्या घटनांवरून असे दिसून येते की, मुसलमान हिंदूंना धमकावत आहेत. आम्ही मथुरा, वृंदावन, नांदगाव, बरसाणा, गोकुळ आणि दौजी यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांवर होळी उत्सवात मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुसलमानांच्या हेतूंमुळे आम्हाला अजूनही धोका आहे. ते अशांतता निर्माण करू शकतात.

रंग आणि गुलाल यांना मुसलमानांचा विरोध असल्याने त्यांना होळीपासून दूर ठेवावे ! – आचार्य बद्रिश

धर्म रक्षा संघाचे राष्ट्रीय संयोजक आचार्य बद्रिश म्हणाले की, मध्यप्रदेश, गुजरात, आणि महाराष्ट्रया  राज्यांत गरबा उत्सवात मुसलमानांच्या सहभागावर निर्बंध घातल्याप्रमाणे उत्तरप्रदेश सरकारनेही निर्बंध घातले पाहिजेत. रंग आणि गुलाल यांना मुसलमानांचा विरोध असल्याने होळी उत्सवात मुसलमानांना स्थान नाही. त्यांना दूर ठेवले पाहिजे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताद्वारे लिहिले पत्र

याचिकाकर्ता दिनेश व त्यांनी रक्ताद्वारे लिहिलेले पत्र

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणातील याचिकाकर्ता दिनेश यांनीही स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ब्रज येथील होळी उत्सवात मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, मुसलमान सणांच्या वेळी मिठाईवर थुंकू शकतात.

ब्रजमध्ये होळी नेहमीच प्रेम आणि शांतता यांद्वारे साजरी केली जाते ! – शाही ईदगाह इंतेजामिया कमिटी

शाही ईदगाह इंतेजामिया कमिटीचे सचिव तन्वीर अहमद म्हणाले की, ब्रजमध्ये होळी नेहमीच प्रेम आणि शांतता यांद्वारे साजरी केली जाते. कोणत्याही समुदायाकडून कधीही तक्रार आलेली नाही. रसखान आणि ताज बीबी यांसारखे महान कृष्ण भक्त, जे मुसलमान होते, तेदेखील पूजनीय आहेत. नुकत्याच संपलेल्या महाकुंभपर्वात मुसलमानांनी हिंदु यात्रेकरूंना आश्रय दिला, तसेच अन्न पुरवले होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !

  • समाजवादी पक्षाचे खासदार सनातन पांडे यांचा विरोध

  • (म्हणे) ‘समाजात फूट पाडण्यासाठी हे सर्व सुनियोजित राजकीय डावपेच !’

समाजवादी पक्षाचे खासदार सनातन पांडे

बलिया (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार सनातन पांडे यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या अध्यक्षांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रावर टीका केली. ते म्हणाले की, राज्यघटना कोणत्याही जाती किंवा धर्म यांच्या आधारावर भेदभाव करण्यास अनुमती देत नाही. (असे जरी असले, तरी राज्यघटनेच्याच नावाखाली गेली ७७ वर्षे हिंदूंशी भेदभाव केला जात आहे, त्यावर पांडे का बोलत नाहीत ? – संपादक) भगवान श्रीकृष्ण प्रेम आणि एकता यांचे प्रतीक होते, त्यांनी कधीही द्वेषाचे बीज पेरले नाही. (हे सांगण्याऐवजी कोणत्या धर्माच्या आधारे द्वेष, आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद, थुंकी जिहाद, भूमी जिहाद आदी केले जात आहे, हे पांडे यांनी सांगावे ! – संपादक) भाजप सत्तेसाठी हिंदु आणि मुसलमान यांमध्ये फूट पाडू इच्छित आहे. समाजात फूट पाडण्यासाठी हे सर्व सुनियोजित राजकीय डावपेच आहेत, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

‘सनातन’ नावाप्रमाणे वागण्याऐवजी सनातनविरोधी विचार मांडणारे समाजवादी पक्षाचे खासदार ! अशा जन्महिंदूंमुळेच हिंदु धर्माची आतापर्यंत हानी झाली आहे आणि होत आहे.