राजकोट (मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारणार

मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. त्या ठिकाणी राज्य सरकारने आता ६० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि.’ या आस्थापनाला दिले आहे.

शिवमय वातावरणात आणि उत्‍साहात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ साजरा

श्री भवानीमातेच्‍या मंदिरासमोर ध्‍वजस्‍तंभाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजन झाले. भगव्‍या ध्‍वजाचे ध्‍वजारोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्‍या हस्‍ते केले. मानाच्‍या पालखीची मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजा करण्‍यात आली.

प्रतापगड (सातारा) येथील सुरक्षारक्षकांच्‍या नियुक्‍तीमध्‍ये गोंधळ !

प्रतापगड-कुंभरोशी ग्रामपंचायतीने स्‍थानिक इच्‍छुकांची काळजीपूर्वक निवड प्रक्रिया पार पाडली आहे; मात्र सुरक्षाव्‍यवस्‍थेसाठी बाहेरील व्‍यक्‍तींची नियुक्‍ती जिल्‍हा परिषदेकडून करण्‍यात आली असल्‍याने स्‍थानिकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे.

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?

जिहादी आतंकवाद असाच संपवावा लागतो !

शिवप्रताप दिना’च्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून हा समाजात फोफावलेला आतंकवाद संपवूया… !

छत्रपती शिवरायांनी धर्मशत्रूला नरकात धाडले तो दिवस, म्हणजे शिवप्रतापदिन !

छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांचे यथार्थ वर्णन ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’, म्हणजे म्लेंच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेले’, असे केलेले आहे. ते आपल्या हिंदूंचे तारणहार प्रियतम छत्रपती शिवराय त्यांना आजच्या दिवशी अत्यंत कृतज्ञतापूर्ण अंतःकरणाने शतवार वंदन करूया !

समर्थ रामदासस्‍वामी यांना ‘लंगोटवाला’ म्‍हणून हिणवत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्‍याचे विधान !

‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्‍वामींना ‘लंगोटवाला’ म्‍हणून त्‍यांचा अवमान केला आहे.

हा हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानच राहील ! – श्री कालीचरण महाराज

मुसलमानांनी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे केंद्र सरकार आणत असलेल्या ‘वक्फ बोर्ड’ कायद्यात सुधारणा आणू नये, अशी मागणी केली आहे; पण हा ‘हिंदुस्थान असून ‘हिंदुस्थानच’ राहील’, असे विधान श्री कालीचरण महाराज यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केले.

निवडणुकीचे घोषणापत्र आणि मतदारांची जागृती !

मतदारांना आमिषे दाखवणे अन् निवडणुकीच्‍या वेळी जातीद्वेष पसरवणे यांतून लोकशाही सशक्‍त होईल का ? जाती नष्‍ट होतील का ?

पन्हाळा गडावर ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम शौर्यपूर्ण वातावरणात पार पडली !

नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी उपस्थितांना शिवा काशीद यांच्या बलीदानाचा प्रसंग आणि त्यातून प्रेरणा कशी घ्यायची ? हे विशद करून सांगितले.