गुळुंब (जिल्हा सातारा) येथे चित्रीकरण स्थळी दमदाटी करणार्या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !
सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.